सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ सातारा येथे सात नोव्हेंबर १९०० रोजी झाला होता. यादिवशी त्यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. या दिनाचे औचित्य व महत्त्व विचारात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जागवण्याच्या उद्देशाने छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे विद्यार्थी दिवस सोहळा संपन्न झाला.
यादिवशी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच जीवनकार्यावर व्याख्यान झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजबिये, शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांच्या उपस्थितीत अभिवादन केले. त्यानंतर सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे मान्यवर पदाधिकारी, शिक्षणाधिकारी, हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत शाळेला मानवंदना देण्याचा कार्यक्रम झाला.
You must be logged in to post a comment.