सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): कराड तालुक्यातील दक्षिण तांबे येथील एक शाळकरी मुलगा गाई चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेला असता सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाठीमागून एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला दरम्यान परिसरातील लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला या हल्ल्यात शाळकरी मुलगा जखमी झाला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नावराज दीपक यादव (वय १२) असे आहे. मागील काही दिवसांपासून तांबे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. राज यादव आपल्या गाईंना करण्यासाठी दक्षिण तांबवे येथील डोंगरावर घेऊन गेला होता. सायंकाळी तो गाय घेऊन घरी परतत असताना बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करीत होता. अचानक बिबट्याने आपला मोर्चा अचानक गाईंच्या दिशेने वळवला. त्यावेळी राजने पळण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्याच्या पाठीवर हल्ला केला. त्याच्यासोबत असलेल्या लोकांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या पुन्हा डोंगराच्या दिशेने पळून गेला. मात्र यात राज याच्या पाठीला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
You must be logged in to post a comment.