सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाने शासनाच्या सूचना प्राप्त होताच अंमलबजावणीची तयारी दर्शविली आहे. शिवाय सध्या नववी ते बारावी पर्यतचे वर्ग सुरू असल्याने शाळांचीही पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास तयारी आहे. पालकांनीही शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे १ लाख १० हजार विद्यार्थी पाचवी ते आठवी या वर्गात शिकतात.
गतवर्षी मार्चपासून विद्यार्थी घरी आहेत. कोरोनामुळे यावर्षी आतापर्यत आॅनलाईन अध्यापन सुरू होते. मात्र कोरोना रूग्णांची घटती संख्या व लसीकरणाची मोहिम सुरू झाल्याने पालकांमधीलही भिती कमी झाली आहे. मोबाईलव्दारे अध्यापनाच्या सवयीमुळे एकलकोंडी बनलेल्या मुलांना आता मित्रांमध्ये मिसळता येणार असून आॅनलाईनऐवजी प्रत्यक्ष अध्यापनामुळे अभ्यासाचाही ताण काही अंशी कमी होणार असल्याने पालकही समाधानी आहेत.
कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून अध्यापनाची तयारी शाळांनी दर्शविली आहे. बहुतांश शाळा शासकीय आदेशाच्याच प्रतिक्षेत होत्या. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दुस?्या दिवसापासून शाळा गजबजणार आहेत. टप्याटप्याने शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होण्याचे प्रमाण सुधारले मात्र विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण अद्यापही शंभर टक्के असल्याचे दिसत नाही. पालकांच्या डोक्यातून अद्यापही कोरोनाचं खुळ जात नसल्यामुळे समतीपत्र देण्यास ते नकार देत आहेत. लसीकरण सुरू झाल्यामुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. पालकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
You must be logged in to post a comment.