सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रस्त्यावरील यवतेश्वर येथे बंधाऱ्यामध्ये मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सोमवारी सकाळी समोर आली.ऋषिकेश राजाराम कारवे (वय १५, रा. यवतेश्वर तालुका सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश हा रविवारी सायंकाळी मित्रांसोबत डोंगरावर फिरायला गेला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये परिसरात पाऊस झाल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी साठले आहे. या बंधाऱ्यामध्ये त्यांना होण्याचा मोह झाला. त्यामुळे मित्रांसमवेत तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र अचानक तो पाण्यामध्ये बुडाला. मित्रांनी धाव घेऊन त्याला बंधाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तत्काळ साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला. ऋषिकेशचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नाही.
You must be logged in to post a comment.