सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : हद्दवाढीमुळे सातारा नगरपालिकेत समावेश झालेल्या शाहूपुरी ग्रामपंचायत बरखास्त झाली आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामे मार्गी लागावीत, या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील यांनी साताराच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी माजी सरपंच गणेश आरडे, अमित कुलकर्णी व नागरिक उपस्थित होते.
सातारा शहराच्या हद्दीवाढीस नुकतीच राज्य सरकारने मंजूर दिली. त्यामुळे शाहूपुरी ग्रामपंचायत बरखास्त झाली असून ग्रामपंचायतीचा कारभार सध्या प्रशासक बघत आहेत. या प्रशासकाच्या आदेशानुसार शाहूपुरीत दैनंदिन सेवासुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी संजय पाटील यांनी केली आहे. शाहूपुरीत सहा प्रभागांत एकाआड एक दिवस कचरा संकलित केला जातो. त्याठिकाणी नियमित कचऱ्याचे संकलन व्हावे. तसेच त्रिशंकू भागातही स्वतंत्र घंटागाडी सुरु केली जावी. रस्त्याकडे दिवे बसविण्यात यावी. तसेच ज्या कामांची ई टेंडरींग झाले आहे. अशा कामांना तातडीने सुरुवात करावी, आदी मागण्या करण्यात आली.
You must be logged in to post a comment.