सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील गेंडामाळ ते अंजली कॉलनी रस्त्यावर शाहूपुरी पोलिसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. यात सुमारे १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्रो व वाहतूक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल , . अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे , मा.सहा . पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना सूचना दिलेल्या होत्या . त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक शसंजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धंदयांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या .
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अवैध गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाची विक्री व वाहतुकी बाबत महिती प्राप्त करीत असताना शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमित माने यांना त्यांचे गोपनिय बातमोदारामार्फत बातमी मिळाली की, सातारा शहरातील गेंडामाळ ते अंजली कॉलनी जाणारे रोडने एक इसम त्याची ओमनी कार क्रमांक एमएच – 11 – एडब्ल्यू -9413 मधुन गुटखा सदृश्य मालाची वाहतूक करणार आहे , अशी माहीती मिळाली .
सदर बातमीचे अनुशंगाने गुन्हे शाखेचे पथक अंजली कॉलनी येथील नगरपालीका गार्डनचे गेट समोरील रस्त्यावर दबा धरून थांबले . त्यानंतर रात्री 20.15 वा.चे सुमारास मिळाले . बातमीतील ओमनी कार क्रमांक एमएच – 11 – एडब्ल्यु -9413 हि आल्याने पथकातील पोलीसांनी कार थांबवून कार चालक व कारची पाहणी केली असता कारमध्ये सदरचा इसम गुटखा सदृश्य माल विक्री करणचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगुन त्याची वाहतुक करीत असताना मिळुन आला . सदर बाबत शाहुपुरी पोलीस ठाणे कडून अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा यांना कळविणेत आलेने अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकाने नमुद मालाची तपासणी करुन 1,59,875 / – रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त करणेत आला आहे . सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री . इम्रान हवालदार यांनी संशयित इसमाचे विरुध्द पोलीस ठाणेस दिले तक्रारी वरुन गुन्हा दाखल करणेत आला असून सदर इसमांस अटक करणेत आली आहे
You must be logged in to post a comment.