शाहुपुरीमधील नादुरुस्त पथदिवे बदलण्याचे काम पुर्ण

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीत शाहुपुरी ग्रामपंचायत समाविष्ट झाल्यापासून शाहुपुरी ग्रामपंचायत हद्दीतील नादुरुस्त पथदिवे बदलायचे काम रेंगाळले होते. ते नगरपालिकेच्यावतीने नुकतेच पूर्ण केले.

शाहुपुरी हद्दीतील नादुरुस्त पथदिवे बदलाण्यासंदर्भात माजी पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, शाहुपुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश आरडे , माजी उपसरपंच उमेश धुमाळ, अमित कुलकर्णी, सुधाकर यादव, शंकर किर्दत, राजेंद्र गिरी, माजी ग्रामपंचायत सदस्य मुग्धा पुरोहित, धनश्री ग्रामोपाध्ये, मयुरा कुलकर्णी, लता राजापुरे, लीलाताई शितोळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली व हे नादुरुस्त पथदिवे तातडीने म्हणजे पावसाळ्यापूर्वी बदलुन त्या जागी व गरज असेल तिथे नवीन पथदिवे बसवणे गरजेचे आहेत हे निदर्शनास आणून दिले,. हि बाब समोर येताच खासदार उदयनराजे यांनी नगराध्यक्षा माधवी कदम,उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व नगरपरिषदेचे अभिजित बापट यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शाहुपुरी हद्दीतील सर्व नादुरुस्त पथदिवे बदलण्याचे काम सरू असून वाॅर्ड क्रमांक दोन मधील नादुरुस्त पथदिवे बदलण्याचे काम पुर्ण झाले आहे. तसेच वाॅर्ड क्रमांक दोन मध्ये सर्व पथदिव्यांसाठी टायमर बसवण्याचे कामही सुरू आहे.

error: Content is protected !!