निरंतर विकास करीत राहणे हेच आमचे प्रयत्न आणि उदिष्ट : उदयनराजे भोसले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व रहिवाश्यांना, मुलभुत सुविधा प्राधान्याने मिळाल्या पाहिजेत. याच विचारातुन प्रत्यक्ष कृती करुन, गतीमान विकासाकरीता साविआ प्रयत्नशील आहे. सुमारे वर्षभरापूर्वीच नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या शाहुपूरी सह सर्वच भागाचा कोणताही दुजाभाव न ठेवता निरंतर विकास करीत राहणे हेच आमचे प्रयत्न आणि उदिष्ट आहे, त्यासाठी कोणतीही कसरत करायला लागली तरी ती केली जाईल, असा शब्द सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी शाहुपूरीवासियांना दिला.

शाहुपूरी भागातील दुस-या टप्यातील विविध विकास कामांच्या भुमीपूजन आणि लोकार्पण प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नागरीकांशी हितगुज साधताना बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अँड. डी. जी. बनकर, किशोर शिंदे, संजय पाटील, माजी सरपंच गणेश आरडे, राजु गिरीगोसावी, अमित कुलकर्णी, अनिरुध्द दाभाडे, आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

सातारा विकास आघाडीकडे कामे मार्गी लावण्याची धमक आहे. विकास काम होवून, त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहीजे, नागरीकांची सोय झाली पाहीजे हा एकच ध्यास घेवून, सकारात्मक पध्दतीने वाटचाल करणारी सातारा विकास आघाडी ही आमची किंवा साविआ च्या नगरसेवकांची आहेच तथापि साविआ ही नागरीकांनी, नागरीकांच्याकरीता उभारलेली आणि नागरीकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आघाडी आहे. दहा कामे मार्गी लागताना, एक-दोन कामे होताना विलंब होतो. परंतु साविआच्या धोरणात कोठेही खोट दिसणार नाही असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

error: Content is protected !!