राणेंच्या ॲक्शनला रिॲक्शन येणारच : शंभूराज देसाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्रात मंत्री झाल्यापासून नारायण राणे यांना आभाळ ठेणगं झाल्यासारखं वाटतंय. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बेजबाबदार वक्तव्य केलंय. ते शिवसैनिक खपवून घेणार नाहीत. ॲक्शनला रिॲक्शन येणारच. शिवसैनिकांच्या रोषाला राणेंना सामोरे जावे लागेल. देशभरात शिवसैनिकांचा उद्रेक होईल, त्याला राणे जबाबदार राहतील, असे स्पष्ट मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.

मंत्री देसाई म्हणाले की, राणेंच्या वक्तव्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था अडचणीत आली आहे. शासन म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस निश्चितपणे करतील. कायदा सुव्यवस्था बिघडायला कोण जबाबदार आहे, याच्या मुळाशी पोलीस जातील. त्यासाठी जबाबदारी व्यक्ती मग ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. महाविकास आघाडीचे सरकार म्हणून जनतेला तोषीस लागू दिली जाणार नाही, असेही देसाई म्हणाले.

error: Content is protected !!