सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आपल्या वेगळेपणमुळे नेहमीच चर्चेत असतात. आज अशाच प्रकारे आपले वेगळेपण दाखवत त्यांनी सातारा जिल्हा प्रशासनातील प्रमुख असणारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे सीईओ या प्रमुख तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्र स्वत:च्या गाडीत बसवित स्वत:च गाडीचे सारथ्य केले. स्वत: गृहराज्यमंत्री आपल्याला घेवून गाडीचे चालवत आहेत हे पाहून हे तिन्ही प्रशासकीय अधिकारी थोडा वेळ चकीत झाले.
निमित्त होते पाटण विधानसभा मतदारसंघातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात प्रशासनाच्या आढावा बैठकीचे या बैठकीकरीता जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे जिल्हा प्रशासनातले प्रमुख तीन अधिकारी उपस्थित होते. आपत्तीची बैठक संपलेनंतर गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंसमवेत या तिन्ही अधिकाऱ्यांनी दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, स्मारकातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे छायाचित्रांचे दालन त्याचबरोबर स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांची पहाणी केली. त्यानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी ठेवला होता. निवासस्थानाकडे जाताना मंत्री ना.देसाईंनी त्यांच्या गाडीत जिल्हाधिकारी यांना आपल्या जागेवर बसवित ते स्वत: वाहकाच्या जागेवर बसले आणि पोलीस अधिक्षक व सीईओ यांना मागे बसण्यास सांगून गाडीचे स्वत:च सारथ्य केले. यावेळी गृहराज्यमंत्री यांचा सर्व ताफा गृहराज्यमंत्र्यांच्या गाडीच्या मागे होता. गाडी निवासस्थानी आणून ना.शंभूराज देसाईंनी या तिन्ही अधिकाऱ्यांचा पाहूणचार करीत त्यांचा मानाचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.
You must be logged in to post a comment.