शहरातील ‘सत्ता ब’ प्रकरणी माळवदेंचा आंदोलनाचा इशारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सत्ता ब’ प्रकरणाच्या वर्गवारी प्रक्रियेत चालढकल होत असल्याच्या अनुभवामुळे माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे पुन्हा आक्रमक झाले आहेत. पीडित मिळकतधारकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

श्री. माळवदे म्हणाले, “सातारा शहरात सत्ता ब प्रकारामुळे नागरिकांना त्यांच्या जागेवर विकसन करता येत नाही. वा जागा विकसित करता येत नाही. सातारा शहरात अशी अनेक प्रकरणे असून, सत्ता ब प्रकाराची प्रकरणे जिल्हाधिकार्‍यांनी निकाली काढावीत यासाठी अनेकदा इशारे, आंदोलने करुनही कार्यवाही होत नाही. याकरता आता शहरातील ज्येष्ट नागरिक दि. २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घरणे आंदोलन करणार आहेत.’ त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, भोगवटा वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करण्यात यावी.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यवाही करण्यात यावी, या प्रकरणातील मूल्यांकन अधिमूल्य रकमांची चलने आपल्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात यावीत, इतर कामाचा व्याप विचारात घेता या कामावर वेळीच स्वाक्षरी करण्यात आपल्याला अवघड जात असल्यास याकामी जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्सम व सक्षम अधिकाऱ्यांकडे अधिकार प्रदान करण्यात यावेत,आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

error: Content is protected !!