सत्ता ब वर्ग प्रकरणांवर निर्णय न घेतल्यास आंदोलन : माळवदे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातार्‍यातील सत्ता ब वर्गच्या प्रकरणावर गेल्या चार महिन्यांमध्ये कार्यवाही झालेली नाही. संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्याची मुदत संपत आली असून शासनाने वार्षिक बाजार मुल्य दर तक्त्यात वाढ केली तर संबंधित मिळकतदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या प्रकरणांवर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्य शासनाने २०१९ साली अध्यादेश काढून वर्ग २ च्या (ब सत्ता प्रकार जमिनी) जमिनी वर्ग १ करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाचा ‘कालाबधी तीन वर्षांचा राहिल असे शासनाने नमूद केले आहे. त्यानुसार मार्च २०२२ पर्यंतच मुदत राहणार आहे. अनेक मिळकतधारकांनी कागदपत्रांचीपूर्तता करुन अर्ज केले आहेत. याला  ३ ते ४ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मिळकतधारकांना चलन भरण्याचा आदेश प्राप्त न होणे ज्यांनी चलनाप्रमाणाने रक्‍कम भरुन देखील जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरित झाल्याचा आदेश प्राप्त न होणे अश तक्रारी आहेत. प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे अनेक मिळकतधारकांन  आर्थिक व मानसिक त्रास सहन कराव लागत आहे. बहुतेक मिळकतदार ज्येष्ठ नागरिक आहेत. वेळेत निर्णय न झाल्यास अनेक सामाजिक समस्य निर्माण होवू शकतात. शासनाने वार्षिक बाजारमुल्य दर तक्त्यात (रेडीरेकनर) अचानक वाढ केली तर मिळकतदारांचे आर्थिक नुकसान होण्याचीच शक्‍यता आहे. तसे झाले तर नव्याने प्रकरणे दाखल करावी लागतील, यासंदर्भात यापूर्वी प्रत्यक्ष भेटून विनंती करुनही अद्याप निर्णय झालेला नाही. संबंधित प्रलंबित प्रकरणे तातडीने निकालात ‘काढाबीत अन्यथा आंदोलन कराळे लागेल, असा इशाराही शंकर माळवटे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!