सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार म्हणून काम करीत असताना सातारा जिल्ह्यातील लोकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर आता मराठी पत्रकार परिषदेनच्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवून राज्यस्तरावर काम करण्याची संधी दिल्यामुळे मी पुढील काळात पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित राज्य उपाध्यक्ष शरद काटकर यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा पत्रकार संघ व मराठी पत्रकार सोशल मीडियाच्यावतीने शासकीय विश्रामगृहावर सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुजित आंबेकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, जीवनधर चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे, सोशल मिडिया संघटेनेचे जिल्हाध्यक्ष सनी शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. काटकर म्हणाले, आजपर्यंत संघटनेसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी माझी राज्य स्तरावर निवड केली.त्यांनी मला संधी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला. तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न मी करीन. या निवडीबद्दल माझ्या कर्मभूमीतील पत्रकार बांधवांनी केलेल्या सत्कारामुळे या कामासाठी बळ मिळाले आहे. पुढील काळात अधिस्विकृती राज्यभर लढा उभारणार आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.
जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी मार्गदर्शक व पाठीराखा शरद काटकर यांची पत्रकारांच्या राज्य संघटनेवर निवड केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.यापुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे काम करीत आलो आहे. भविष्यातही अशाच पध्दतीने जिल्ह्यात संघटनेची वाटचाल सुरू ठेवणार आहोत. तसेच सर्व प्रमुख प्रिंट, इलेट्रॉनिक्स, सोशल मिडीयात काम करणाऱ्या पत्रकारांनी एकीने काम करण्याची गरज आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, शरद काटकर यांच्या सत्कार समारंभाला पत्रकारांच्या उपस्थितीवरुन सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची एकी दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सर्व पत्रकार एक दिलाने काम करीत असतात. भविष्यात अशा पध्दतीने संघटनेचे काम करणार असून येणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात येतील. त्यासाठी श्री. काटकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असेलच. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील संघटनेंमध्ये आणखी मोठ्या पदावर झेप घ्यावी, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
यावेळी अनेकांनी शरद काटकर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पत्रकार गजानन चेणगे, विठ्ठल हेंद्रे, चंद्रसेन जाधव,प्रशांत जगताप, सम्राट गायकवाड,विनीत जवळकर, अमोल निकम, गुरुनाथ जाधव, प्रतीक भद्रे, साई सावंत,तुषार तपासे, सचिन सापते, शशिकांत कणसे, अमित वाघमारे, इम्तियाज मुजावर, चंद्रकांत कुंभार, संतोष नलावडे, ओमकार कदम, संजय कारंडे, जावेद खान, प्रकाश शिंदे, संजय सुपेकर यांच्यासह प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडिया, मराठी पत्रकार परिषदेचे, सोशल मीडियाचे पत्रकार, पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनी शिंदे यांनी केले तर आभार विठ्ठल हेंद्रे यांनी मानले.
You must be logged in to post a comment.