शरद पवारांकडून नाईक-निंबाळकर व निमकर कुटुंबियांचे सांत्वन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेचे सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मातोश्री श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक निंबाळकर (बाईसाहेब महाराज) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची फलटण येथील ‘‘सरोज व्हीला‘‘ या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यानंतर खा शरद पवार यांनी त्यांचे सहकारी आणि नुकतेच निधन झालेले पद्मश्री बनविहारी निमकर यांच्या घरी जाऊन निमकर कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
 

या वेळी विधानपरिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण पंचायत समितीचे सभापती  शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर, बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव  व उद्योजिका प्रिती प्रभाकर घार्गे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!