सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :किसनवीर कारखान्याचे संस्थापक किसन वीर यांच्या कवठे गावातून काल कारखान्याचे भाग भांडवल (शेअर्स कॅपिटल)गोळा करण्याचा शुभारंभ काल करण्यात आला. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत पिसाळ व किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
आ.मकरंद पाटील म्हणाले, किसनवीर सहकारी कारखाना वाचविण्यासाठी व तो सहकारात ठेवण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे. किसनवीर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी आता सभासद शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे.
ज्या शेतकऱ्यांचे सभासदांचे भागभांडवल अपूर्ण असेल तसेच नूतन शेअर्स खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास सेवा सोसायटय़ांमधून १५ हजार रुपये कर्ज अल्प दरामध्ये पाच वर्षांच्या मुदतीवर देण्यात येणार आहे. तसेच ज्यांची शेअर्स कारखान्यावर अशा सभासदांनाही याचा लाभ घेता येणार आहे. या माध्यमातून सुमारे १०० ते १५० कोटी भागभांडवल उभा करण्याचा मानस आहे. यासाठी कारखान्याचे संचालक आपल्या गटातील गावोगावी बैठका घेणार आहेत. त्यांना विकास सेवा सोसायट्यांचे सचिव विभागीय विकास अधिकारी व कारखान्याचे कर्मचारी मदत करणार आहेत.
आ.मकरंद पाटील यांनी यावेळी सभासदांना जास्तीजास्त भाग भांडवल उभे करून कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी. आपला किसनवीर सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी सर्व तालुक्यातुन सभासदांनी उस्फुर्त पणे असाच सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
You must be logged in to post a comment.