जावळीत हाय होल्टेज ड्रामा, मतदान केंद्रावर शिंदे-रांजणे यांच्यात हास्यविनोद

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघात हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या हायकमांडपासून विविध आमदारांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानेश्वर रांजणे माघार घेण्यात तयार नसल्याने आज दिवसभरात जावलीचे वातावरण चांगलेच तापले होते. आज मतदान केंद्रावर रांजणे यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे आणि शिंदे समर्थक यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघात ज्ञानदेव रांजणेंच्या भूमिकेमुळे व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमुळे चक्रव्युहात सापडलेल्या आमदार शशीकांत शिंदेंना यातून बाहेर काढण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लक्ष घातले. त्यांनी आमदार मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजेंना मोबाईलवरून संपर्क करून शशीकांत शिंदेंना जिल्हा बँकेतील मार्ग सोपा करण्याची सूचना केली. त्यानुसार शिवेंद्रसिंहराजेंनी जावळीतील मतदारांची मनधरणी करत आमदार शिंदेंना मदत करण्याची सूचना केली. या मनधरणीतून कायच निष्पन्न झाले नाही.

आज सकाळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली बाचाबाची नंतर आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानेश्वर रांजणे समोरासमोर आले त्यांनी एकमेकांशी हास्य विनोद केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना रांजणे म्हणाले, आमदार शिंदे यांनी मला संपर्क केला असता तर मी माघार घेतली असती पण संपर्कच झाला नाही. यावर शशिकांत शिंदे म्हणाले, रांजणे हा माझा कार्यकर्ता मीच त्यांला राजेंकड घेऊन गेलो आज ते राजेंच्या गटातून प्रजेला भेटायला येत नव्हते. मग मी त्यांना कसा संपर्क साधणार अशाप्रकारे त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपचा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली.

error: Content is protected !!