सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये उदयनराजे भोसले यांना मान सन्मान होता. पण त्यांना केंद्रात मंत्रीपदाचे त्यांना आश्वासन दिल्याने ते भाजपमध्ये गेले. मात्र, नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये त्यांना डावलून इतरांना संधी देण्यात आली. त्यामुळे हा छत्रपती गादीचा अवमान आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
वडाचीवाडी येथे सह्याद्री मंगल कार्यालयात जरंडेश्वर कारखाना आंदोलनविषयी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले,‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम होते. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला. भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन राजीनामा द्यायला लावला असल्याचे त्यांच्या जवळचे लोक सांगत होते. मीही तसे ऐकून होतो, मात्र नुकत्याच झालेल्या विस्तारामध्ये त्यांना संधी न देऊन पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला आहे.’
शिंदे म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात भाजपची विशेष अशी ताकद नाही. राष्ट्रवादी-कॉंग्रेससह अन्य मित्रपक्षांचे नेते स्वत:कडे खेचून भाजपने ताकद असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीत असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील सरकारमध्ये वजन असते. या सरकारद्वारे त्यांनी विकासकामे निश्चितपणे केली असती, मात्र भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करुन घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, याचे दु:ख वाटते
You must be logged in to post a comment.