सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावळी तालुक्यातील प्रतापगड कारखाना अडचणीत आल्याने तो १६ वर्षांच्या करारानुसार किसन वीर कारखान्यास चालवायला दिला असताना तो तीन हंगाम बंद असल्याने शेतकरी चिंता ग्रस्त आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रतापगड कारखाना सुरू झाला पाहिजे, जर कारखाना चालवायचा नसेल तर तर माझी तयारी आहे, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
जरंडेश्वर कारखान्यावर राजकीय हेतूने ईडीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ‘कुडाळ’ येथे जावळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जावळी तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्दैवाने जावळी तालुक्यातील प्रतापगड कारखाना बंद पडल्याने इथल्या शेतकऱ्यांनी ऊस कुठे घालायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रतापगड कारखाना चालवायला दिला असताना तो तीन हंगाम बंद असल्याने शेतकरी चिंता ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत जरंडेश्वर साखर कारखाना इथल्या शेतकऱ्यांचा ऊस नेत होता. परंतु ईडीने राजकीय द्वेषाने केलेल्या कारवाईमुळे आता शेतकरी अडचणीत आहेत. चुकीच्या गोष्टींची कोणी पाठराखण करणार नाही मात्र जरंडेश्वर बंद करण्याचा घाट जो घातला जातोय ते शेतकरी सहन करणार नाही. जरंडेश्वर सुरू रहावा म्हणून मोठं शेतकरी आंदोलन उभं करू व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ताकद काय आहे हे ईडीला दाखवून देऊ, असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
You must be logged in to post a comment.