सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये विधानपरिषदेत आ.शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेले तीन महत्त्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत
लाखो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या प्रलंबित पाणंद रस्त्याविषयी राज्यातील सर्व महसूल विभागाने तत्काळ प्रश्न सोडवावेत यासंबंधी अभ्यासपूर्ण विषय मांडून लाखो शेतकऱ्यांचा पाणंद रस्त्यांच्या विषय लावला मार्गी लावला. तसेच ग्रामीण भागातील हजारो होनहार खेळाडूविषयी असलेल्या धोरणात सुधारणा करून त्यांना नॅशनल लेव्हल पर्यंत जाण्यास प्रोत्साहन मिळेल यासाठी सरकारने त्यात काही महत्त्वपूर्ण बदल करणे गरजेचे असल्याबाबतची सूचना केल्याने ग्रामीण भागातील हजारो युवा खेळाडूंना त्याचा म लाभ मिळणार आहे.
तसेच रिलायन्स,अमेझॉन, डी मार्ट इत्यादी कंपन्या बरोबर कायदेशीर ठराव करून राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील हजारो महिला बचत गटातील महिलांना त्यांच्या पदार्थाना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मार्केट उपलब्ध करून देण्याबाबत सूचना तथा मागणी केली.यामुळे राज्यातील लाखो महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्या साठी सुलभ मार्ग मिळणार आहे .
You must be logged in to post a comment.