सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावली त्या जनतेने मला दहा वर्ष प्रतिनिधत्व काळजी सांग दिली त्यानंतर कोरेगाव चा ही जनतेने मला दहा वर्ष संगत दिली. पण सध्या पुलाखालून बरंच पाणी गेला आहे. काहींना जिल्ह्याचे राजकारण आपल्या ताब्यात असावा असे वाटते. पण मी त्यांना सांगू इच्छित आहोत आम्ही राजघराणे जन्म नसलो तरी आम्ही जनतेच्या मनातले राजे आहोत, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
जावळी तालुक्यातील मोरखेड येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम व व मान्यवर उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले,जिल्हा बँक निवडणुकीनंतर पहिल्याप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने जावलीतील लोकांचे प्रेम बघितला मिळाले. ज्यांना आम्ही मोठं केलं तेच आमचे राजकारण संपवायला निघाले आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची ताकद निश्चित दाखवल्या शिवाय शांत बसणार नाही.
You must be logged in to post a comment.