सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरातून बाहेर पडताना व परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील, असे कळविले असताना देखील बरेचसे नागरिक मास्कचा वापर न करता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरी, ग्रामीण भागामध्ये नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.या आदेशानुसार दंडाची आकारणी पोलीस विभाग, ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, यांनी व शहरी भागात पोलीस विभाग, संबंधित नगर पालिका, नगरपंचायत, नगर परिषद विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
You must be logged in to post a comment.