सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. सर्व उमेदवार सुमारे 1200 च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यापूर्वी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या.
प्रतापगड कारखान्यासाठी १४ मार्चला मतदान झाली होती. त्यामध्ये ३२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता व सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते. सातारा, जावळी व महाबळेश्वर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक झाली.
त्यापैकी सौरभ शिंदे यांच्या पॅनेलने तीन जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १८ जागांसाठी एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेल विरूद्ध राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारखाना बचाव पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. आज सकाळपासून सभासद मतदारांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली होती. आठ दिवसांपासून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आज सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य स्पष्ट झाले.
You must be logged in to post a comment.