सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :ऐतिहासिक सातारा शहराची सर्वदूर ओळख निर्माण करणाऱ्या शिवस्पर्शाने पावन किल्ले अजिंक्यताऱ्यावर जाणाऱ्या आधीच रस्त्याचे कामाची बोंब त्यात गटाराचे काम ही निकृष्ट झाल्याचा पोलखोल शिवसैनिकांनी केला. लोकप्रतिनिधीं फक्त निधी मंजूर करतात तर अधिकारी कामाच्या साईड वर फिरकत नसल्याने कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जात नाही. ठेकेदाराच्या भरोसावर सुरू असलेले हे काम निकृष्ट होत आहे. खबरदार, किल्ले अजिंक्यताऱ्याच्या कोणतेही काम गुणवत्ता पुर्ण असावे. अन्यथा शिवसैनिक त्याला सोडणार नाही, असा इशारा शहर प्रमुख निलेश मोरे यांनी दिला आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावर जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. त्या रस्त्याच्या बाजूला असणारे गटाराचे काम ठेकेदार गुणवत्तापूर्ण न करता उकरत असल्याचे शिवसैनिकांकडे तक्रार आली. यावर माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहण्यासाठी शिवसैनिक किल्ल्यावर गेले असताना फक्त ग्रीटचा मुलायमा देत ठेकेदाराच्या कामाचा पोलखोल झाला.
आधीच रस्त्याचे काम हि दर्जाहीन असताना गटाराचे काम हि तसेच होत असताना ना लोकप्रतिनिधी ना बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. यावर आक्रमक पवित्रा घेत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून फेरनिवीदा काढण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या मराठ्यांची राजधानी असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावर जाणाऱ्या रस्ता आणि गटाराचे काम दर्जाहीन करण्याचे ठेकेदाराचे धाडस अचंबित करणारे आहे.दि.१२ जानेवारी राजधानी साताऱ्याचा स्थापना दिवस साजरा होत असताना शहर प्रमुख निलेश मोरे, गणेश आहिवले, अभिजित सपकाळ सयाजी शिंदे, अमोल खुडे, अमोल पवार , संतोष खुडे,प्रथमेश बाबर यांच्यासह शिवसैनिकांनी केलेला पोलखोल सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
.
You must be logged in to post a comment.