जिल्ह्यातील शिवसैनिकांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : उद्धव ठाकरे यांनी रविवारी सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांशी मातोश्रीवर संवाद साधला. दसरा मेळाव्यानंतर आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. राज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे. रविवारी सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला. दसरा मेळाव्यानंतर आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे संकेत दिले.

उद्धव ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची घेतली माहिती : तसेच एकनाध शिंदे यांच्या संपर्कात कोण कोण होते, त्या पदाधिकाऱ्यांची माहिती घेतत्याचेही समजते. उपनेते बानुगडे पाटील, माजी आमदार सपकाळांची उपस्थिती मातोश्रीवर रविवारी झालेल्या बैठकीला शिवव्याख्याते तथा शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील, जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद, कराड तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, शिवसेना मलकापूर शहरप्रमुख मधुकर शेलार, शिवसेना कराड शहरप्रमुख शशिराज करपे, कराड शहर युवा सेना प्रमुख अक्षय गवळी उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्रात भाजपने मुसंडी मारल्याने उद्धव ठाकरेंचे लक्ष : उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा करून आगामी दौऱ्याची माहिती दिली. तसेच या पदाधिकाऱ्यांच्या निष्ठेचे कौतुक केले. उद्धव ठाकरेंचे पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. सहकारी साखर कारखानदारीचा पट्टा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने मुसंडी मारली आहे. तसेच, शिवसेनेला हादरे दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. तसे संकेत त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या बैठकीत दिले आहेत.

राज्यातील सत्तांतरानंतरच्या परिस्थितीची माहिती घेत आपण दसरा मेळाव्यानंतर दौरा करणार असल्याचे सूचक संकेत त्यांनी दिले आहेत. या बैठकीनंतर निष्ठावंत चार्ज झाले असून, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्व तयारीसाठी बाह्या सरसावल्या आहेत

error: Content is protected !!