शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश मोरे यांची मागणी
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले तसेच विधानसभेलाही करणार आहेत. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसैनिकांना न डावलता त्यांचा योग्य सन्मान राखावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली यात सातारा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली.आगामी विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील मित्र पक्षांचे असणाऱ्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम केले जाणार आहे. मात्र आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद यासह इतर समित्यांमध्ये शिवसैनिकांना ज्या त्या विधानसभेतील उमेदवारांनी विश्वासात घेऊन पदाधिकाऱ्यांचा योग्य सन्मान महायुतीतील घटक पक्षांचा राखावा.
आगामी विधानसभेच्या महायुतीच्या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिकांना विचारात घेण्यात यावे अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात योग्य तो निर्णय घ्यावा लागेल,असेही निलेश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
You must be logged in to post a comment.