साताऱ्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सातारा जिल्ह्यामध्ये उच्च व तंञ शिक्षण मंञी उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आले.

यावेळी गृहराज्यमंञी शंभुराज देसाई, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, धैर्यशील कदम, उपजिल्हाप्रमुख अजित यादव , उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, खंडाळा तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, सातारा शहरप्रमुख निलेश मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री उदय सांमत यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या. शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका, असे आवाहन केले.

गावागावात शिवसंपर्क अभियान सुरू करा, आपला पक्ष बळकट करा. यात विधानसभानिहाय, तालुकानिहाय आणि पंचायचनिहाय कामे करणे अपेक्षित आह. अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार ज्या योजना रावबत आहे, त्या योजना लोकांपर्यंत पोहोत आहेत का, याची खातरजमा करा, यात विधानसभानिहाय, तालुकानिहाय आणि पंचायतनिहाय कामे करणे अपेक्षित आहे. अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार ज्या योजना रावबत आहे, त्या योजना लोकांपर्यंत पोहोत आहेत का, याची खातरजमा करा असा असे आदेशही सामंत यांनी दिले.

error: Content is protected !!