पालिकेची निवडणूक शिवसेना लढणार : ना.उदय सामंत

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : आगामी सातारा नगरपालिकेची निवडणूक शिवसेना पक्षाच्या चिन्हावर लढणार, अशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

आज सातारा नगरपालिका निवडणूक २०२१-२२ च्या पार्श्वभूमीवर आयोजित सातारा शहर शिवसैनिक व पदाधिकारी जाहीर मेळाव्यास संबोधित केले. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानूगडे पाटील, माजी आ. सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते व शिवसैनिक उपस्थित होते.

आज सातारा नगरपालिका निवडणूक २०२१-२२ च्या पार्श्वभूमीवर आयोजित सातारा शहर शिवसैनिक व पदाधिकारी जाहीर मेळाव्यामध्ये अनेकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेश केलेल्या व्यक्तींचे मी शिवसेना पक्षामध्ये मनस्वी स्वागत करतो.

error: Content is protected !!