इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची निदर्शने

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : एकीकडे वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले. जिल्ह्यात मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. शिवसेनेकडून जागोजागी निदर्शनं करण्यात आली.

 शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,  शिवसेना समन्वयक दगडुदादा सकपाळ, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील  यांच्या सूचनेनुसार आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.  यावेळी चार चाकी गाडीला दोर बांधून गाडी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणण्यात आली व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून मोदी सरकार च्या नावाने बोंब मारण्यात आली, यावेळी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा पेट्रोल,डिझेल आणि गॅस वाढीचा निषेध करण्यात आला.

 यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, युवासेना सातारा जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले,उत्तर कराड संपर्कप्रमुख शंकर सकपाळ, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते,सातारा तालुकाप्रमुख दत्ताभाऊ नलवडे, आतिश ननावरे,  अनिल गुजर, शिवाजी सावंत, उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी केंद्रसरकार हाय हाय ,मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत सातारा येथे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोरोना संकटातून सामान्य नागरिक अद्यापही सावरला नाही. सर्वसामान्यांची जगण्यासाठी प्रचंड धडपड सुरू आहे. बेरोजगारी पराकोटीची वाढली आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना पुन्हा सामान्य माणसाला देशोधडीला लावणारी महागाई गगनाला भिडलेली असल्याचा आरोप करत शिवसेनेने केला.  

error: Content is protected !!