Skip to content
Tuesday, December 24, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
सातारा जिल्हा
सातारा
शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मार्च 2021अखेर अद्ययावत : पालकमंत्री
सातारा
शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मार्च 2021अखेर अद्ययावत : पालकमंत्री
30th June 2020
प्रतिनिधी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे राज्याच्या नव्हे तर देशाच्या अभिमानाचा केंद्रबिंदू आहे. तो जाज्ज्वल्य इतिहास जनतेसमोर यावा याकरिता श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्यासाठी आणि त्याच्या पूर्णत्वासाठी 12 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मार्च 2021पूर्वी ते पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अधिक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता शंकर दराडे तसेच या संग्रहालयाचे पुरातत्त्व विभागाचे सहायक अभिरक्षक अभिरक्षक उदय सुर्वे, संग्रहालयाचे वास्तू विशारद विजय गजबर उपस्थित होते.
या वस्तू संग्रहालयात तळमजला व पहिल्या मजल्यावर वस्तू संग्रहालयाच्या प्रदर्शनासाठी मोठमोठी दालने, वरांडे, कार्यालयीन जागा, इमारतीच्या पूर्व भागातील तळघरात पार्किंगची व सभागृहाची सोय केलेली आहे. या सर्व बाबी जाणून घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यात काही आवश्यक बदलही सुचवले. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही काही बदलाविषयी सूचना केल्या.
पर्यटकांच्या बसेससाठी पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृह तसेच तिकीट घर बसस्थानकाच्या बाजूच्या रस्त्यालगत करण्यात आले असून पर्यटकांसाठी प्रवेशद्वारही त्याच बाजूला असणार आहे. याचे सर्व बांधकाम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती राजभोज यांनी दिली. याठिकाणी शिवकाल उभा करण्यासाठी संपूर्ण अभ्यास करण्यात आला असून महाराजांच्या आरमारापासून शस्त्रास्त्रे, नाणे इथपर्यंतची माहिती विविध रूपात दाखविण्यात येणार असल्याचे गजबर यांनी यावेळी सांगितले.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
‘अनलॉक’ काळात ग्रामीण भागातील रुग्णांत वाढ : गृहमंत्री अनिल देशमुख
जिल्ह्यात 99 दिवसांत 1031 पॉझिटिव्ह!
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.