सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे उपकेंद्र सातारा येथे होणेबाबत काल खासदार उदयनराजे भोसले यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांची भेट घेतल्यानंतर आज सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेऊन जागेची उपलब्धता तसेच प्रशासकीय परवानग्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन सर्व प्रश्न निकाली काढण्याबाबत च्या सूचना केल्या व लवकरात लवकर विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली.
श्री शिवाजी विद्यापीठाचे उपकेद्र शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थ्याच्या हिताचे
असल्याने ते व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. शिवाजी विद्यापीठाने देखिल उपकेंद्र सुरु करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. मागे एकदा उपकेंद्रासाठी खावलीची जागा पहाणी झालेली आहे. सातारचे जिल्हाधिकारी.शेखर सिंह यांना उपकेंद्रासाठी खावली येथील जागा उपलब्ध होणेबाबत संबंधीत विभागाच्या प्रशासकीय विभागांची येत्या आठवड्यात बैठक घेवून योग्य तो निर्णय घ्यावा अशी आम जनतेच्या वतीने विशेष विनंती केली.
जिल्हाधिकारी यांना यासंदर्भातील लेखी निवेदन देताना स्पष्ट केले की, सातारा जिल्हा कोल्हापूरशी जवळ असल्याने, कोल्हापूर, सांगली,सिंधुदूर्ग या जिल्हयातील विद्यार्थ्याच्या करीता, पदवी आणि पदवीत्तर शिक्षणासाठी श्री शिवाजी विद्यापीठ संलग्न करण्यात आलेले आहे. या विद्यापीठामधुन भारतातील जवळजवळ सर्व अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या पध्दतीने महाविद्यालयांच्या माध्यमातुन शिकवले जातात. विश्वविद्यालयाशी एकदा विद्यार्थी जोडला गेला की, त्याचे शिक्षण चालु असताना किंवा झाल्यावर देखिल विश्वविद्यालयाशी नेहमीच संपर्क करावा लागत असतो.
मायग्रेशन, सर्टीफिकेट, मार्कशिट असेल अश्या विविध कारणाकरीता विश्वविद्यालयाशी सर्वच आजी माजी विद्यार्थी असलेल्या सर्वांचा संबंध येत असतो. यापार्श्वभुमीवर सातारा येथे उपकेंद्र झाल्यास, श्री शिवाजी विश्वविद्यालयाशी सर्व कामकाज सातारा उपकेंद्रामधुन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक वर्ग यांना ज्यावेळी जावे लागेल ते सातारा येथील उपकेंद्रामध्ये जावे लागेल, त्यामुळे, विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयांचा, वेळ, पैसा, श्रम या तीनही गोष्टी वाचणार आहेत.
कालच आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के,प्र.कुलगुरु डॉ.पी.एच.पाटील
कुलसचिब व्ही.डि.नांदवडेकर, अमित कुलकर्णी, आणि अन्य मान्यवरांबरोबर कोल्हापूर येथे श्री शिवाजी विद्यापीठामध्ये चर्चा केली आहे. तत्कालीन कुलगरु आदणीय डॉ. श्री.देवानंद शिंदे यांनी उपकेंद्रास तत्वतः मान्यता देखिल दिली आहे. जागा उपलब्ध होणे महत्वाचे आहे. शैक्षणिक चांगल्या कार्यास आणि श्री शिवाजी विद्यापीठास जागा देण्याबाबत कोणतीही समस्या उद्भवली जाणे शक्य नाही.
You must be logged in to post a comment.