प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचे निधन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : इतिहासाचे अभ्यासक, व सातारा जिल्हा परिषदेचे शेंद्रे गटाचे विद्यमान सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव काशिनाथ चव्हाण (वय ७६ रा. भाटमरळी, ता. सातारा) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार केशव चव्हाण, बांधकाम व्यावसायिक सयाजीराव चव्हाण, मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डॉ. जयदीप चव्हाण यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!