शिवेंद्रसिंहराजेंसह १७ जणांची निर्दोष मुक्तता

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) – पुणे-बेंगलोर महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर एक वर्षांपूर्वी आंदोलन करून टोलवसूली बंद केल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सर्व आरोपींची वाई न्यायालायाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली.

महामार्गावर पडलेल्या खड्डामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. याचा निषेधार्थ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह समर्थकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आनेवाडी, ता. वाई येथे आंदोलन केले होते. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिलिंद कदम, अविनाश कदम, कांचन साळुंखे, फिरोज पठाण आदींसह १८ जणांवर गुन्हा दाखल केला होता. यावर वाई न्यायालायने आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सबळ पुराव्या अभावी त्यांची मुक्ता करण्यात आली आहे.

error: Content is protected !!