सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘नागरिक, व्यापारी, दुकानदार आणि शेतकरी अडचणीत असताना आठवडाभर शिथिलता दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनला सर्वांचीच नापसंदी आहे. त्यामुळे प्रशासनाने काही निर्बंध ठेवून कडक लॉकडाऊन मागे घ्यावा,’ अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने भाष्य केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनचा निर्णय हा व्यापारी, दुकानदार व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन घ्यायला हवा. कारण, आता लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे नाराजीचाच सूर आहे. विकेंड लॉकडाऊन शनिवार व रविवार पूर्णपणे कडकडीत ठेवावा. १०० टक्के बंद हा उपाय नव्हे. त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर नागरिकांनी गर्दी करुन नये. गरजेपुरतेच बाहेर पडावे. कोणीही गैरफायदा न घेता आपली जबाबदारी ओळखावी.
साताºयापेक्षा पुणे मोठे आहे. तरीही तेथे रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे साताºयातील रुग्णसंख्येबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रशासन कुठे कमी पडते का ? याचाही विचार व्हावा, असे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, ‘कोरोना चाचणी अहवाल वेळेवर भरले जातात याची प्रशासनाने शहनिशा करावी. कारण, त्यामुळे आकडा वाढलेला दिसतो का हे ही पाहण्याची गरज आहे.
You must be logged in to post a comment.