उदयनराजे कुठे हे रामराजेंना विचारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार पॅनल मधून बिनविरोध निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले कुठे आहेत हे रामराजेंना विचारा, असे वक्तव्य भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीमधील सहकार पॅनेल मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यासाठीचा जाहीर मेळावा समर्थ मल्टीपर्पज हॉल, गजानन हौसिंग सोसायटी कराड येथे आज संपन्न झाला.

याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, मदानराव मोहिते, सुभाषराव जोशी, भीमराव पाटील, ॲड.राजाभाऊ उंडाळकर, प्रकाश पाटील(बापू), शिवरूपराजे खर्डेकर, मानसिंगराव जगदाळे, देवराजदादा पाटील, जगदीशदादा जगताप, सुभाष पाटील(काका), जयंत पाटील(काका), सौरभ पाटील, प्रशांत यादव, राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, प्रदीप विधाते, निवासराव पाटील(आण्णा), सत्यजीतसिंह पाटणकर, कांतीलाल पाटील, प्रणव ताटे, अशोकराव पाटील-पार्लेकर, रामभाऊ लेंभे, गोपाळराव धोकटे, सुरेश साळुंखे, निवासराव पाटील, राजेश पाटील-वाठारकर, सुहास बोराटे, सुनील पाटील, सौ.ऋतुजा पाटील, सौ.कांचन साळुंखे, सौ.सांगीता साळुंखे(माई) तसेच तालुकातील मतदार, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी संवाद साधला. जिल्हा बँकेला उदयनराजे भोसले यांची बिनविरोध झाल्यापासून ते सहकार पॅनलच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी दिसत नाहीत ते कुठे असा प्रश्न शिवेंद्रराजे यांना विचारला असता त्यांनी हा प्रश्न रामराजे नाईक-निंबाळकर यांना विचारावा असे वक्तव्य केले.
स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व.किसन वीर यांनी पायाभरणी केलेली बँक त्यांच्याच विचाराने चालू आहे . बँकेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही. शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायासाठी अल्प व्याजदराने अर्थ पुरवठा केला . अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना ४५ कोटी रुपयांचा अर्थ पुरवठा करून तरुणांना उच्च शिक्षणासाठी अर्थ पुरवठा केला तसेच नवंउद्योजक म्हणून उभे केल. कोरोना व अतिवृष्टीच्या काळात देखील सामाजिक बंधीलकीतून काम केले आहे. बँकेचे कामकाज उत्कृष्ट असल्यामुळेच बँक देशांमध्ये सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी असून बँकेत नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.

error: Content is protected !!