शिवेंद्रराजेंच्या बालेकिल्ल्यात दिपक पवारांनी लावला सुरुंग

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतदारसंघातील परळी विभाग हा नेहमीच त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी सुरुंग लावला आहे.

सातारा तालुक्यातील परळी विभागातील सर्व ग्रामपंचायतपासून पंचायत समिती जिल्हा परिषदेसह विविध संस्थांवर शिवेंद्रराजे यांच्या गटाची सत्ता राहिली आहे. शिवेंद्रराजे यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांचे या परिसरावर वर्चस्व राहिले आहे. या विभागाने नेहमीच शिवेंद्रराजे यांच्या पाठीशी ताकद उभी केली. मात्र विरोधी गटाला त्यांच्या विरोधात मागील अनेक वर्षांपासून विरोधक मिळत नव्हता. प्रत्येक निवडणुकीत या विभागातील गावांनी शिवेंद्रराजे यांना मोठ्या मताधिक्याने केले निवडून दिले.

शिवेंद्रराजे भोसले व राजू भोसले यांचे समर्थक असलेले शशी वायकर यांनी नुकताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, गुलाबराव चव्हाण, दीपक चाळके, सचिन जाधव उपस्थित होते.

error: Content is protected !!