सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नगरविकास आघाडी आपल्या स्वबळावर पालिकेची निवडणूक लढवणार आहे, असे भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केली.
शिवेंद्रराजे म्हणाले, निवडणूकीला उभे रहायला सगळय़ांना मुभा आहे. तो लोकशाहीने दिलेला आधिकार आहे. त्यामुळे कोणी लढवायची आणि कोणी नाही लढवायची हे आपण ठरवू शकत नाही. त्यामध्ये मग राष्ट्रवादी असु दे. सेनेचे असू दे. भाजपा असू दे की रिपाइं असे कोणाला बंधने घालू शकत नाही. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी लढवावी, त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. नगरविकास आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.