सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची रविवारी सायंकाळी महामार्गावरील लिंबखिंड परिसरात भेट झाली.
भेटीदरम्यान थोडावेळ अनौपचारिक चर्चा केल्यानंतर ते दोघेही मार्गस्थ झाले. दोनच दिवसांपूर्वी राज्यसभेच्या उमेदवारीत डावलल्याच्या कारणावरून शिवेंद्रसिंहराजे यांनी छत्रपती संभाजीराजे यांची बाजू घेत राजकीय भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यांच्या झालेल्या भेटीने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
You must be logged in to post a comment.