निवडणुकीपूर्वी उदयनराजेंची नौटंकी : शिवेंद्रराजेंची टीका

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टर बाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकासकामांवर खर्च केला असतातर बरं झालं असत. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने खा. उदयनराजे यांची ही नौटंकी सुरू असल्याचे टोला आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या विकासकामांच्या शुभारंभाचा चांगला धडाका उडवला आहे. यावर बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंनी चालवलेली दुचाकी आणि पोस्टर बाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

error: Content is protected !!