शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने-सामने

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे या दोन नेत्यांमध्ये मागील वर्षभरापासून बिनसले आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यापासून त्यांचा जावली तालुक्यात वावर वाढला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील दरी वाढली असून दोन महिन्यापूर्वी शिवेंद्रराजेंनी “मला संपवण्याचा प्रयत्न केल्यास मी काट्याने काटा काढीन”, असा इशारा दिला होता. शशिकांत शिंदेंनीही जशाच तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली. त्यात आता पुन्हा एकदा शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकावरून शिवेंद्रसिंहराजेंनी शशिकांत शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या तोंडावर दोन आमदार आमने-सामने येऊ लागले आहे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रक काढले होते. त्यामध्ये जावळी तालुक्याचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी व्हावे अशी आग्रही मागणी असून महाविकास आघाडी सरकारने विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीन हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मारकासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे केली असून लवकरच हे स्मारक उभं राहील. २६\११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यातील अतिरेक्याला पकडताना स्व. तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याची, पराक्रमाची आठवण राहावी, त्यांच्या त्यागाचा सन्मान व्हावा, युवकांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळावी म्हणून हे स्मारक होणे गरजेचे वाटते. असे म्हटले होते.

त्यावर आता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रक काढून शशिकांत शिंदे यांनी केलेली मागणी हास्यास्पद असल्याची टिका केली.

शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे की, २६ नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेणा-या शस्त्र सज्ज अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडताना हौतात्म्य आलेल्या तुकाराम ओंबळे यांचा पराकम आजही समस्त भारतीयांच्या हृदयात ठसून राहिला आहे. जावळीच्या या वीर सुपुत्राच्या केडंबे या मुळगावी उभारण्यात येणा-या भव्य स्मारकाचा प्रश्न लवकारात लवकर मार्गी लागावा असे केडंबे ग्रामस्थांना व समस्त जावलीकरांना वाटते. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नियोजित स्मारकासाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्ण य यापुर्वीच्या बैठकीत झाला असतानाही ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या समवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत स्मारकासाठी ५ कोटी रूपयांच्या निधीची मागणी करणे हे हस्यास्पद असून शहीद ओंबळे यांच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना करणारे आहे, असे मत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केले.

हुतात्मा ओंबळे यांच्या पराक्रमामुळे जावली तालुक्यातील केंडबे हे छोटेशे गाव देशात प्रसिध्द झाले शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमाची दखल घेवून राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी केंडबे येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यांचे स्मारक झाल्यास केडवे गावचे महत्व वाढून ओंबळे यांचे स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्मारक झाल्यास पर्यटन वृध्दीव्या दृष्टीने अश्वासक वातावरण निर्माण होवून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. यासाठी शहिद ओंबळे यांच्या भव्य स्मारकावरोवरच केंडबे गावास अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधां व गावाचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी जास्तीजास्त निधी देण्याची मागणी आपण वेळोवेळी शासनाकडे केली आहे. केंडबे गावातील स्मारकासाठीच्या जमिन हस्तांतरणाच्या कामात वास्तविक जिल्हा प्रशासनाने पुढे होत कागदपत्रांची पूर्तता करून स्मारकाचे कामास गती देणे गरजेचे होते. मात्र निव्वळ दप्तर दिरंगाईमुळेच स्मारकाचे काम गेली अनेक वर्षे रखडले स्मारकाच्या निधीसाठी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावाही केला असून यापूर्वी स्मारक निधी संदर्भात झालेल्या शासनाच्या बैठकीत शहीद ओंबळे यांच्या स्मारकासाठी व केंडबे गावच्या विकासाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तथापी ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या समवेत मुंबई येथे नुकत्याच वैठकीत स्मारकासाठी ५ कोटी रूपयांची मागणी करणे ही एकप्रकारे अवहेलना करण्याचाच प्रकार असल्याचेही आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!