सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे मंगळवारी सकाळी जिल्हा न्यायालयात हजर झाले. चार वर्षांपूर्वी कोजागिरी पौर्णिमेदिवशी गाजलेल्या सुरुची राडा प्रकरणात जामीन नियमित राहण्यासाठी ते आपल्या सहकार्यांसोबत आले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर ते न्यायालयातून बाहेर पडले.
आनेवाडी टोलनाक्याच्या वादातून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले एकमेकांसमोर उभे राहिले होते. याच वादातून दोन्ही राजेंसह त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या खटल्याचे कामकाज आता सेशन कोर्टात चालणार आहे. यामुळे पहिले जामीन नियमित करण्याची प्रक्रिया होती. त्यानुसार आमदार शिवेंद्रराजे व त्यांचे समर्थक साताऱ्यातील जिल्हा न्यायालयात हजर झाले.
You must be logged in to post a comment.