शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर खरमरीत टीका

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :उदयनराजेंनी रविवारी लुंगी घालून फोटोशूट केलं होतं. ते फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरला होता. उदयन राजेंच्या या फोटोशूटवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र खरमरीत टीका केली आहे.

शिवेंद्रराजे म्हणाले, नगरपालिकेची निवडणूक आली की, लुंगी लावणे, गाडीत गाणे लावून फिरणे हे प्रकार होतात. आपलं ५ वर्षातलं अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा ते प्रयत्न करत असल्याचं शिवेंद्रराजे म्हणाले आहे.

राजकीय लोकांनाही आता फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागतेय हा जरा गमतीचा भाग आहे. नगरपालिकेची निवडणूक आली की, हे असं सगळं होतंय. लोकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्यामुळे सातारकरांनी त्यांच्याकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहावं’ असे आवाहन शिवेंद्रराजेंनी केले.

error: Content is protected !!