सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : थकीत असलेले वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे महावितरण कंपनीकडून कनेक्शन तोडले जात असल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्यावतीने आक्रमक भूमिक घेण्यात आली. पुसेगाव, ता. खटाव येथे महावितरण कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याची गाडी फोडून आंदोलन करण्यात आले.
लाॅकडाऊन काळात ग्राहकांना मोठ्या रक्कमेची वीज बिले आली. शासनाच्यावतीने वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. संतप्त झालेल्या ग्राहकांचे म्हणणे एकण्यास प्रशासनाला वेळ नाही. त्यामुळे आज पुसेगाव येथे शिवसेनेच्यावतीने आक्रमक भूमिका घेत महावितरण वसुली आधिकाऱ्याची गाडी फोडण्यात आली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी वसुली अधिकारी शैलेश राक्षे व कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना न देता कनेक्शन तोडू नये, असा इशारा दिला.
You must be logged in to post a comment.