कऱ्हाड पालिकेतही भगवा फडकविण्याचा शंभूराजांचा निर्धार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिवसेनेच्या जिल्हा, तालुका प्रमुखांनी विकास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाटून दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. तसेच विकासाचे काम करताना साधा शिवसैनिक डोळ्यासमोर ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन करून कऱ्हाड नगरपालिकातेही चांगल्या प्रकारे काम करून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू, असा शब्दही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात शनिवारी शिवसेनेच्यावतीने कऱ्हाड शहर, दक्षिण, उत्तर व पाटण तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या शिव संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, तालुकाध्यक्ष रामभाऊ रैनाक, सातारा-सांगली संपर्कप्रमुख शंकर संकपाळ, कऱ्हाड शहर प्रमुख शशिराज करपे, महिला जिल्हा संघटिका अनिता जाधव, कुलदीप क्षीरसागर आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!