उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात मोफत नेत्र तपासणी शिबीर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सातारा शहर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,सातारा, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या नेत्र तपासणी शिबीरचे शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, तालुका प्रमुख अनिल गुजर, रुपाताई लेंभे, मंजिरी सावंत, सुमित नाईक, अभिजित सकपाळ, प्रथमेश बाबर, रवींद्र साळुंखे, कुमार कारंडे, सुशांत यादव, अविनाश पवार, सचिन कारंडे तसेच सातारा शहरातील नागरिक, शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!