सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेच्या नेत्यांची सातारा येथील जिल्हा शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, शेखर गोरे, धैर्यशील कदम, डी. एम. बावळेकर व पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक झाली.
या बैठकीत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने शिवसेनेची काय भुमिका घ्यायची, कोणते उमेदवार ठरवायचे, किती जागा लढवायच्या यावर चर्चा झाली. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामाध्यमातुन जिल्हा बॅकेची निवडणुक लढवली गेली तर आम्हीही साथ देवु. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणुन जर विचारणा झाली तर आम्ही चर्चा करु. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हण यांच्याशी चर्चा करुन कॉंग्रेसच्या जागा ते तर शिवसेनेच्या जागा आम्ही ठरवु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.