शिवसेना आमदाराने थेट शेतात उतरुन केली पेरणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील जाईंट किलर म्हणून ओळखले जाणारे आमदार महेश शिंदे नाईक हे गेल्या वर्षा जोरदार चर्चेत आहेत. महेश शिंदे एका हटके स्टाईलने सध्या चर्चेत आले आहेत.

कोरोनाच्या पहिल्यात लाटेत स्वखर्चाने कोरोना हाॅस्पीटल उभे केल्याने महेश शिंदे राज्यात चर्चेत आले होते. दुसऱ्यात लाटेतही त्यांनी चार कोरोना हाॅस्पीटल उभारून अनेकांचे प्राण वाचवले. सध्या कालपासून असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता ही सध्या कालपासून असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात महेश शिंदे शेतात उतरुन बैलाच्या सहाय्याने व ट्रॅक्टरच्या यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा सध्या कृषी संजीवनी सप्ताह 21 जून ते 1 जुलै या कालावधीत साजरा होत आहे. याअंतर्गत विविध योजनांचे मार्गदर्शन आणि शेतीशाळा हा कार्यक्रम जांब व चिंचणेर निंब येथे आयोजित करण्यात आला होता. याचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महेश शिंदे यांनी स्वतः सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक केले

error: Content is protected !!