सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा धास्ती कमी होत नसताना डेंग्यू संसर्ग रुग्ण वाढत आहेत. याबाबत शहरात आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्यासाठी नगरपालिकेला कमी पडते.यातून रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून सुस्तावलेली यंत्रणा कामाला लावा. अन्यथा पालिकेच्या दारात बोंब ठोकणार,”असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी नगरपालिकेला निवेदन देत दिला आहे.
सातारा शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जशा उपाययोजना केल्या तशाच डेंग्यू संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या नाहीत. यामुळे रोज डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे.मात्र नगरपालिकेतील एक नगरसेवक याबाबत चकार शब्द काढत नाही. आरोग्य आणि स्वच्छता यंत्रणा सुस्तावलेली असल्याने डेंग्यू संसर्गीतांची आकडेवारी वाढत आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकारी आणि सैनिकांनी निवेदन दिले.
यावेळी शहरप्रमुख निलेश मोरे यांनी”, “तत्काळ उपाययोजना करा नाही तर याविरोधात बोंबाबोंब आंदोलन करणार आहे.” यावेळी उपशहरप्रमुख,अभिजित सपकाळ,गणेश अहिवळे,विभागप्रमुख सुमित नाईक,शाखाप्रमुख अमोल पवार,उपशाखाप्रमुख प्रथमेश बाबर आणि इतर पद्धधिकारी उपस्थित होते !
You must be logged in to post a comment.