साताऱ्यात युवकाची शोले स्टाईल ड्रामेबाजी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेसमोरील पाण्याच्या टाकीवर चढून एका युवकाने रविवारी शोले स्टाईल ड्रामेबाजी करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान सातारा शहर पोलिसांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त करत ताब्यात घेतले.

रविवार दिनांक 29 ऑगस्ट..वेळ सायंकाळ 5.30 वाजताची..सातारा नगरपालिकासमोरील सुमारे 80 फुटांवरील पाण्याच्या टाकीवरील रेलिंगवर एक युवक धोकादायक अवस्थेत चढून बसला..‘मी मरणार आहे, मला मरायचे आहे..’ असा आरडाओरडा करत होता..या शोले स्टाईल ड्रामेबाजीमुळे सातारचा राजपथ बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस सोमनाथ शिंदे तिकडे धाव घेतली. नगरपालिकेसमोर पाण्याच्या टाकीवर बसून तेथेच ओक्साबोक्सी रडू लागला. पाण्याच्या टाकीवर युवक चढून तो रेलिंगला धरुन स्टंट करत असल्याचे दिसला.

पोलीस शिंदे यांनी टाकीवर जाऊन त्या युवकाची समजूत काढत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यानंतर ताब्यात घेतले असता हा प्रकार त्याने कौटुंबिक कलहातून करत असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!