श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र निधी संकलन अभियानास प्रारंभ

सातारा येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांचे जिल्हा कार्यालयाचे उदघाटन झाले.

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : श्रीराम जन्मस्थानी होणाऱ्या राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून निधी संकलनाचे अभियान दि 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत सगळीकडे होणार आहे. या अभियानाची सुरुवात आज सातारा येथे जयराम स्वामी संस्थान, वडगावचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या हस्ते झाले. राजसी व्यापारी संकुल पोवई नाका, सातारा येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांचे जिल्हा कार्यालयाचे उदघाटन झाले.

या उदघाटन कार्यक्रमासाठी सूर्याजी गावालक्ष उपाख्य, बाळासाहेब स्वामी (अध्यक्ष, रामदास स्वामी संस्थान ,सज्जनगड) विलासबाबा जवळ (अध्यक्ष, व्यसनमुक्ती युवक संघटना) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ सुभाष दर्भे (जिल्हा संघचालक, रा.स्व.संघ ) मोहन साठे (विश्व हिंदू परिषद), अमित कुलकर्णी (भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य) हे मान्यवर उपस्थित होते .

यावेळी विठ्ठल महाराज म्हणाले, ” गेली अनेक वर्षे अयोध्या येथील राम जन्मभूमी येथे असणारे राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्गी लागला आहे. ४९० वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अयोध्या येथील श्रीराम जन्मस्थानावर एक भव्य मंदिर उभे राहावे ही प्रत्येक हिंदू च्या मनात असणारी आकांक्षा पूर्णत्वास जाणार आहे”.

बाळासाहेब स्वामी म्हणाले ” पुढील दोन महिने हे निधी संकलनाचे महाभियान सर्व शहरात व गावांमध्ये होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात निधी द्यावा “
विलास बाबा जवळ व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील या अभियानासाठी शुभेच्छा दिल्या . डॉ सुभाष दर्भे यांनी आभार मानले. यावेळी सातारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!