श्रीधर हादगे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

जकातवाडी ता. सातारा येथील आश्रमशाळेत अन्नदान वाटप करतांना मा.श्रीधर हादगे,पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे आणि इतर.

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) ः सातारा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांचे चिरंजीव श्रीधर हादगे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त जकातवाडी, ता. सातारा येथील आश्रम शाळेमधील मुलांना फळ व अन्नदान वाटप करण्यात आले.

खा.उदयनराजे भोसले यांचे समर्थक व युवा नेते श्रीधर हादगे यांचा आज (१४मार्च) जन्मदिवस . कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चाहत्यांना व कार्यकर्त्यांना उत्साहात वाढदिवस साजरा करता आला नाही. म्हणून श्रीधर हादगे कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी जकातवाडी येथील आश्रम शाळेतील मुलांना फळ व अन्नदान वाटप करून त्यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे, राष्ट्रसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम हादगे , दिपराज हादगे, धनश्री हादगे, समाधान शेलार, अमोल पवार, अर्जुन पवार, रवी कुचेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, श्रीधर हादगे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभाशीर्वाद दिले. तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही प्रत्यक्ष भेटून, फोनवरून,समाजमाध्यमाद्वारे हादगे यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!